1
सिव्हिल लाइन्स, गोंदिया येथे घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार चोरटा अखेर गोंदिया शहर पोलिसांच्या जाळ्यात…
घरफोडीच्या गुन्ह्यातील किंमती- 15 लाख 33 हजार रुपयांचे दागीणे केले हस्तगत….. गोंदिया शहर पोलीसांची धडाकेबाज कामगीरी…
गोंदिया / धनराज भगत
दिनांक- 9 मार्च 2024 रोजी फिर्यादी नामे मो. जाफर मो. आमीन कंडुरेवाला वय 45 वर्षे, रा.सिव्हील लाईन, गोंदिया हे बाहेरगावी गेले असता त्यांचे राहते घराचे समोरील दाराचा कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन आलमारीत ठेवलेले सोण्याचे दागिणे 55 तोळे, टॅब व रोख रक्कम असा एकूण 20 लाख 74 हजार 500/- रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यान्नी चोरुन नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारी वरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्र.120/2024 कलम 454, 457, 380 भादंवी. अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा, यांनी गुन्ह्याचे स्वरूप पाहता सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटे गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेवून जेरबंद करण्याचे निर्देश सूचना दिलेल्या होत्या.
मा. वरिष्ठांचे आदेश निर्देशान्वये नमूद घरफोडी गुन्हातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याकरिता पोलीस ठाणे गोंदिया शहर, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया ची विविध पथके तयार करून नेमण्यात आलेली होती. पो.नि. चंद्रकांत सुर्यवंशी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता कसोशीने प्रयत्न करण्यात आले. घरफोडी झालेल्या गुन्हाचे घटनास्थळ शेजारील तसेच सदर मार्ग परिसरातील जवळपास 200 च्या वर सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासण्यात आले. एकंदरीत सी. सी. टी. व्ही. फुटेज आणि गोपनीय माहितगार आणि गोपनिय सुत्राच्या माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा अट्टल चोरटा आरोपी नामे – साहील उर्फ माट्या राजु आंबेकर रा. विठ्ठल मंदीर वार्ड, निबांळकर वाडी चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर याने चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून पळून गेल्यानंतर त्याने वर्धा येथे खून केल्याने त्यास वर्धा येथील गुन्ह्यांत अटक करण्यात आलेली होती त्यामुळे. गोंदिया शहर पोलीसांनी वर्धा रेल्वे पोलीस स्टेशन येथे जावुन खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी हा गोंदिया येथे घरफोडीचा गुन्हा केलेला आरोपी असल्याने अट्टल चोरटा नामे- साहील उर्फ माट्या राजु आंबेकर यास घरफोडी गुन्ह्यांत ताब्यात घेवून घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने कसुन चौकशी व तपास केला असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे राहते घराची चंद्रपुर येथे जावुन घरझडती घेतली असता नमूद घरफोडीचे गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आलेला आहे. ज्यात
1) सोन्याचे कंगन 02 जोडी
2) सोन्याचे बांगड्या 08 नग
3) सोन्याचे झुमके 01 जोडी
4) सोन्याचे झुमके 01 नग
5) सोन्याचे अंगुठी 03 नग
6) सोन्याचा हार 03 नग
7) सोन्याचा चैन 02 नग
8) सोन्याचे पौलीश केलेले 03 नग हार
9)सोन्याचे पॉलीश केलेली आंगठी 1 नग
10) सोन्याचे पॉलीश केलेले झुमके
11) 06 नग पांढ-या रंगाचा बेनटेक्सच्या आंगठ्या असा एकुण – 15 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे.
नमूद घरफोडीचे गुन्ह्यात अटक करण्यात आलेला अट्टल गुन्हेगार आरोपी नामे- साहील उर्फ माट्या राजु आंबेकर रा. विठ्ठल मंदीर वार्ड, निबांळकर वाडी, चंद्रपुर ता. जिल्हा. चंद्रपुर हा अट्टल गुन्हेगार असून याने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे- 4, रामनगर येथे – 8, राजुरा येथे – 2, चंद्रपूर शहर येथे – 9 , गुन्ह्यांची नोंद असून, वर्धा रेल्वे येथे – खुनाचा गुन्हा -1, तसेच गोंदिया येथे घरफोडीचा गुन्हा -1 अश्याप्रकारे एकूण 25 गुन्ह्यांची मालिकाच केलेली असून नोंदी आहेत..नमूद घरफोडीचे गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सोमनाथ कदम पोलीस ठाणे गोंदिया शहर हे करित आहेत..आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता दिनांक 26/03/2024 रोजी पर्यंत आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे .