लोकसभा निवडणुकीकरिता आमगाव, देवरी व सालेकसा विधानसभा महाविकास आघाडीची आढाव बैठक संपन्न

0
3
1

गोंदिया / धनराज भगत

आमगांव : दि.23 मार्च 2024 रोजी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरिता आमगाव, देवरी व सालेकसा विधानसभा महाविकास आघाडीची आढाव बैठक आमगांव येथिल जनसंपर्क कार्यालयात दिलीप भाऊ बंसोड जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया यांच्या अध्यक्षतेमध्ये व  आमदार सहसराम कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये,सैलेश जायसवाल शिवसेना(ऊ ), संदीप भाटिया जी, राधेलाल पटले जी, तीरथ येटरे रा का पा (शरद पवार गुट)यांचे विशेष उपस्थिती मध्ये संपन्न झाली.
यावेळी संजयजी बहेकार तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आमगाव यांच्या सह आमगाव तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व सेल विभाग व फ्रंटलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद सदस्य छबू ताई उके,उषाताई मेंढे व प्रमिला गणवीर वंदना ताई काडे उपसरपंच व सदस्य आणि तालुका महिला काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटी आमगाव हे उपस्थित होते, व आजच्या या बैठकीची संचालन मा. प्रशांत रावते महासचिव अनु. जाती काँग्रेस कमिटी आमगाव यांनी केले आणि शेवट चा आभार मा. गणेश जी हुकरे (अध्यक्ष किसन काँग्रेस) यांनी मानले.