डी इ आय सी मध्ये आर ओ पी कॅम्प मध्ये 45 बालकांवर उपचार

0
10
1

गोंदिया / धनराज भगत

बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात डी इ आय सी केंद्रात नवजात शिशूच्या मोफत डोळ्याच्या गहन चिकत्सेचे
आर ओ पी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्प चे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश
मोहबे यांनी केले.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गंगाबाई हॉस्पिटल च्या अधीक्षक डॉ नितीका पोयाम आर एम ओ बी डी जैस्वाल बालरोग तज्ञ डॉ सचिनकुमार उइके वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर डी आई सी च्या वरिष्ठ बालरोग तज्ञा डॉ पद्मिनी तुरकर डॉ रहांगडाले डॉ अमित शेंडे मॅनेजर पारस लोणारे आणि अजित सिंग आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा स्तरीय शिघ्र प्रतिसाद आणि उपचार केंद्रातर्फे महिन्यातून 2 वेळा नागपूर येथील सुप्रसिध्द सुरज नेत्र चिकित्सालय तर्फे नवजात शिशु चा आर ओ पी व जन्मजात तिरळेपणा आदी व्यंगावर मोफत निदान उपचार व पुनर्वसन केले जाते अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी प्रस्तविकेतून सांगितली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी आर ओ पी कॅम्प चे उद्घाटन केले व नेत्र चिकित्सा अंतर्गत खरेदी केलेली यंत्र सामग्री डी आई सी केंद्राला मॅनेजर श्री पारस लोणारे यांच्या कडे सुपूर्द केली.
अविकसित व कमी वजनाचे जे बालक अत्यधिक काळ एस एन सी यु मध्ये भरती राहिले त्यांची आर ओ पी साठी स्क्रिनिंग करणे अनिवार्य आहे अशी माहिती
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी दिली.
या वेळी या कॅम्प मध्ये नागपूर येथून आलेल्या सुप्रसिद्ध सुरज नेत्र पेढी च्या नेत्र विशारद डॉक्टरांनी नवजात शिशुची मोफत गहन नेत्र चिकित्सा व निदान व उपचार केले आर बी एस के टीम तर्फे रेफेर केलेल्या व एस एन सी यु मधून डिस्चार्ज झालेल्या 45 नवजात शिशु व बालके यांचा उपचार डी इ आई सी केंद्रात करण्यात आला कॅम्प साठी केंद्राचे
श्रवण तंत्रज्ञ श्री रोशन फिजियो श्रीमती प्रकुर्ती मनोहर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लिल्हारे आदिनी परिश्रम घेतले.