आमगाव पोलीसांची धडक दर्जेदार कारवाई :- देशी दारुने भरलेल्या पेट्या अवैधरित्या वाहतूक प्रकरणी दोघांना घेतले ताब्यात…

0
21
1

# एकूण 15 नग देशी दारूच्या पेट्या, एक चारचाकी वाहन असा किंमती एकूण 2 लाख 06 हजार 100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त…….गुन्हा दाखल.

गोंदिया / धनराज भगत

 आगामी सन-उत्सव, निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे त्यांचे पो. ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर, अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करण्याचे तसेच अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाडसत्र मोहीम राबविण्यात येत असून उपविभाग आमगाव अंतर्गत क्षेत्रातील पोलीस ठाणे परीसरात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यावर धाडी घालून कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक- 26 मार्च 2024 रोजी पो. ठाणे आमगाव अंतर्गत अंजोरा बिट परिसरात आमगाव ते देवरी मार्गावर दोन ईसम चारचाकी वाहनात अवैद्यरित्या देशी दारू भरून वाहतूक करीत असल्याचे गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने प्राप्त खात्रीशीर खबरे वरून पोलीस निरिक्षक यांनी पोलीस पथकासह मौजा बोरकन्हार ते पाऊळदवना जाणाऱ्या रोडवर सापळा रचून अंदाजे साय.5.30 वा. सुमारास धाड कारवाई केली असता- एक पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गोल्ड वाहन क्र. MH35 CV- 5405 ज्यात चालक ईसंम नामे – 1) राकेश सुकचंद बिसेन वय 34 रा. धावडीटोला , 2) देवानंद मोतीदास कुराहे वय-23 वर्ष रा. कुल्पा असे मिळून आले.सुमो वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये मधल्या व मागच्या सिटवर देशी दारूनी भरलेले एकूण 15 खरड्याचे बाक्स (पेट्या) मिळून आल्यात.त्यातील 10 बाक्समध्ये 480 नग बॉटल मध्ये 180 मिली नी देशी दारू भरलेले असून उर्वरीत 5 बाक्स मध्ये 500 नग देशी दारू 90 मिली नी भरलेले असे एकूण किंमती 51,100/- रु चा माल व पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गोल्ड किंमती अंदाजे- 1,55,000/- असा एकूण 2,06,100/- रु चा मुद्देमाल विना परवाना वाहतूक करताना मिळून आल्याने रीतसर कायदेशीर जप्तीची प्रक्रिया करून जप्त मुद्देमाल, वाहन व आरोपी यांना पो. स्टे.आमगाव येथे आणून अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी आरोपी नामे-1) राकेश सुकचंद बिसेन वय-34 वर्ष रा. धावडीटोला ता. आमगाव जि. गोदिंया 2) देवानंद मोतीदास कुराहे वय-23 वर्ष रा. कुल्पा ता. लांजी, जि. बालाघाट. यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदयांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची दर्जेदार धाड कारवाई पोलीस अधिक्षक  निखिल पिंगळे,अपर पोलीस अधिक्षक  नित्यानंद झा,उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रमोद मडामे उपविभाग आमगांव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सपोनि.चव्हाण, पोहवा. दसरे, बर्वे, पोशि. उपराडे शेंडे पोलीस ठाणे आमगांव यांनी कामगिरी केली आहे.