जागृती सहकारी पत संस्था, मुंडिकोटा याच्या जगंम मालमत्ता जप्ती आदेशाला, विभागीय सहनिबंधक नागपुर यांचे स्थगितीचे आदेश

0
53
1

गोंदिया / धनराज भगत

जागृती सहकारी पत संस्था मुंडीकोटा यांच्याकडून ओमप्रकाश येरपुडे यांनी रोख क्रेडिट खात्यावर कर्ज घेतला.
सदर कर्ज 17/02/2020 रोजी 81,9,940/- (आठ लाख एकोनविस हजार नऊशे चाळीस )रुपये भरले, पण सदर रक्कम कर्जदार यांच्या खात्यात वळते करण्यास टाळाटाळ केला.म्हणून ओम‌प्रकाश हे उच्च न्यायालय येथे गेले आणि रिट पिटीशन क्र.9993/2020 दाखल केले.
मा. उच्च न्यायालयाने सदर रक्कम ट्रान्सफर करन्याचे आदेश 20/10/2020 दिले पण बँकेने सदर रक्कम ट्रांसफर केले नाही. आणि सदर रक्कम 28/08/2022 ला लोन धारकाच्या खात्यात जमा केली. यामुळे लोन धारकावार अवाजवी व्याज लावून त्याना 48,4,924 /- रुपये भरन्या सबंधी अथवा त्याची जगंम मालमत्ता जप्ती सबंधी आदेश दिनांक 11/03/2024 ला काढला.
सदर जप्ती आदेशाविरुद्ध ओमप्रकाश येरपुडे मा. विभागीय सह‌निबंधक, नागपुर यांच्या कोर्टात गेले आणि रिव्हीजन क्र. 508/2024 दाखल केला आणि दिनांक 28/ 03 2024 ला होणाऱ्या जप्ती आदेशाविरुद्ध स्थगनादेश मा.कोर्टाने पारीत केला. सदर रिवीजन कोर्टासमोर अँड अदिती योगेश पारधी/कटरे यांनी सादर केली.
सदर खटला दाखल करण्यास अँड लखनसिंह कटरे,अँड कृष्णा पारधी,खुमेश कटरे,रफ़ीक़ शेख़ , भोजराज फुंडे यांनी सहकार्य केले.