गोंदिया / धनराज भगत
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प.स.गोरेगाव अंतर्गत संपूर्ण तालुक्यातील अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक यांचे प्रसूती पूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंध कायदा विषयक जनजागृती अभियान कार्यशाळेचे दिनांक 27 मार्च रोजी करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून एडवोकॅटे सपाटे पर्यवेक्षिका श्रीमती राऊत आणि कार्यक्रमा च्या अध्यक्ष म्हणून गोरेगाव ब्लॉक च्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या वेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की अलीकडे मुलगा मुलगी लिंग गुणोत्तर प्रमाण पाहिले तर मुलींची संख्या कमी होत आहे.
हा प्रकार खूपच गंभीर आहे.मुलींची संख्या अशीच कमी कमी होत गेली तर काही वर्षांनी लग्नाला मुली भेटणार नाहीत….? त्यामुळे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे की आपण प्रसूती पूर्व गर्भलिंगनिदान कुठे होत असेल तर त्याची सूचना जिल्हा प्राधिकरण प्रमुख म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिली पाहिजे अंगणवाडी सेविकेकडे गर्भवतीचा तिच्या ए एन सी नोंदणी पासून डेटा उपलब्ध असतो त्याचा वापर करून प्रत्येक गर्भवतीचे ए एन सी ट्रॅकिंग आपण केले पाहिजे आता शासनाची आमची मुलगी म्हणून नवीन वेबसाईट ओपन झाली आहे तिथे पण आपण तक्रार करू शकतो नाव गोपनीय ठेवले जाते आणि तक्रार खरी असेल तर 1 लाख इनाम पण मिळू शकतो म्हणून मुलीच्या जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा प्रचार व प्रसार करा असे आवाहन डॉ सुवर्णा हुबेकर यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना केले.
यावेळी के टी एस च्या लिगल ऍड वाईजर अडवोकॅटे श्रीमती सपाटे यांनी पी सी पी एन डी टी कायदा आणि त्याची कलमे आणि शिक्षा या बाबत सखोल माहिती अंगणवाडी सेविकांना दिली.
गोरेगाव च्या सी डी पी ओ श्रीमती श्रीवास्तव यांनी आवाहन केले की अंगणवाडी सेविकांना नेहमी जागल्याच्या भूमिकेत राहिले पहिजे. समाजात जर गर्भलिंग निदान बाबत थोडी जरी माहिती मिळाली तरी अधिकृत प्राधिकरणाला त्वरित माहिती देऊन आपले कर्तव्य निभावले पाहिजे कार्यशाळेत आमची मुलगी वेबसाईट बाबत चे स्टिकर चे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन तालुका पर्यवेक्षक श्रीमती राऊत यांनी केले कार्यशाळा साठी गोरेगाव ब्लॉक च्या सर्व अंगणवाडी सेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या.

