वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे
दिनांक :-28 मार्च 2024
28 मार्च च्या सायंकाळी आठ वाजता चालू स्थितीत असलेल्या कार ने अचानक नांदोरा डफरे नजीक चारचाकी प्रवासी वाहनाने पेट घेतला .सदर वाहन पुलगाव कडे जात असतांना अपघातग्रस्त झाले. या वाहनात काही महिला व मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे . घटनेचे गांभीर लक्षात घेता महिलांनी प्रसंगावधान घेत गाडीअपघातग्रस्त झाल्यानंतर प्रवासी महिलाना खाली उतरण्यास यश आल्याने अनर्थ टळला. माहिती मिळताच देवळीच्या अग्निशामक दलाने तसेच देवळी पोलिसांनी वेळीच पोहचून आग आटोक्यात आणली. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.