ट्रकटरची विद्यूत खाबाला जबर धड़क , घटना स्थळावरून पसार….

0
79

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-29 मार्च 2024

भिडी येथिल भरवस्तितील तळणी मार्गावर एका बिना नंबर प्लेटच्या टॅक्टरनी उभ्या विद्युत खांबाला जबर धड़क दिल्याने विद्युत खांब तूटून पडला व त्यावरील विजप्रवाह असलेले तार लोबकळत बराच वेळ राहीले सामाजिक कार्यकर्त्यानी समय सूचकता घेवून त्या विज प्रवाह असलेल्या तारांकडे कोनालाही जावू दिले नाही व विज प्रवाह बंद करण्याच्या सूचना विज वितरण कंपनिला देण्यात आल्या त्यामूळे येथे झालेल्या जबर धड़क अपघातात जीवित हाणी टळली तर नागरिकांत ”खूब वाचलो ‘रे बा” असा सूर उगळत होता .

भिडी येथे अवैध उत्खनन,रेती व मूरूम माफियांचा मोठ्या प्रमाणात हैदोस माजला असून यात काही राजकीय पंक्षाच्या कार्यकर्त्याचे टॅक्टर असल्याने त्यावरील चालक हे आपल्या मनमर्जी ने वाहने चालून गावात गंल्लित जेथे टॅक्टर वाहन जावू शकत नाही अश्या गंल्लिमंध्ये जड़ वाहणे टाकूण त्या गंल्लितील ग्रामपंचायतनी बाधलेल्या सिमेंट नाल्या तोडल्याचे अनेक प्रकार येथे घडत आहे तर गावातील रस्त्याची दयणिय अवस्था केली आहे.

29 मार्च ला सकाळी 7 वाजता वार्ड क्र.3 मधिल भरवस्तितील तळणी मार्गावर एका विद्युत खांबाला बिना नंबर प्लेटच्या टॅक्टरनी व मागे असलेल्या ट्रालिला सूंधा नंबर प्लेट नाही अस्या बिना नंबर प्लेटच्या टॅक्टरनी जबर धड़क दिली

असे बिना नंबर असलेल्या वाहनाचा व वाहण मालकांचा विज वितरण कंपनी कसूण शोध घेणार का ?असा प्रश्न येथे नागरिक करीत आहे व अश्या बिना नंबर वाहने चालून अवैध धंदे करित असून या कड़े संबधित अधिकारी दूर्लक्ष करित आहे.घटणा स्थळावर विज वितरण कंपनी च्या अधिका-यानी पाहणी केली त्याच वेळी टॅक्टर मालकांनी आपली जेसिपी (वाहण)येथे पाठवून बिना नंबर प्लेटच्या टॅक्टर, ट्राली काढून नेली जसे येथे काही घडलेच नाही असा दिखावा येथे निर्माण केला ज्यावेळी येथे अपघात झाला त्यावेळी अपघातस्थळी वार्डातिल उपस्थित नागरिकांतून हा जबर धड़क देणारा टॅक्टर हां येथिल एका राजकीय पंक्षाच्या कार्यकर्त्याचा असल्याची चर्चा करिता होते पूढे बिना नंबर प्लेटच्या टॅक्टर मालकांवर संबंधित अधिकारी काय कार्यवाही करते या कड़े ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.