धक्कादायक : द बर्निंग कार पुनरावृत्ती : देवळी यशोदा नदीच्या धक्कादायक : द बर्निंग कार पुनरावृत्ती : देवळी यशोदा नदीच्या पुलावर कार ने अचानक घेतला पेट…… कार ने अचानक घेतला पेट……
देवळी परीसरातील 24 तासात दुसरी घटना, नागरिकांत भीतीचे वातावरण…
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे
आज 29 मार्च ला दुपारी 5 वाजता सावंगी मेघे येथील कार जंक्शन या ऑटोमोबाईल्स मध्ये, दुरुस्तीला आलेली कार क्र. MH-12-GF- 9641 ( फियाट figo ) ही कार दुरुस्त झाल्यानंतर कारची ट्रायल घेण्याकरिता सावंगी वरून देवळी नदीच्या पुलापर्यंत आल्यानंतर गाडीच्या बॉयनट मधून वासआणि धूर यायला सुरुवात झाली. कारचालक हेमंत मनोवर यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित गाडी बाजूला घेऊन उभी ठेवली असता, काही कळाच्या आत कारणे उग्ररूप धारण केले. कारचालक आणि क्लीनर यांनी घटनेचे गांभीर्य पाहून गाडीतून त्वरित उतरले त्यामुळे पुढील अनर्थ टळला, सदर कार ही कांबळे नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती कारचालकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच देवळी नगर परिषद अग्निशामक दलाचे वाहन चालक अक्षय क्षीरसागर, रंजीत दाभेकर, आसिफ शेख, शेख अकिल फारुकी यांनी शर्तीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. घटनास्थळी देवळी पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस आणि काही कर्मचारी उपस्थित होते.पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.