एक जेष्ठ कलावंत आणि कीर्तनकार अनंतराम रहांगडाले (महाराज जी) काळाच्या पडद्याआड

0
41

पंकज रहांगडाले /गोरेगाव

“तुकड्या ने खंजरी बजा दिया – सारी दुनिया को जगा दिया” अश्या भजनांमधून समाजप्रबोधन करणारे कीर्तनकार, बालाघाटी नकलांच्या माध्यमातून मनोरंजन करणारे कलावंत, अनंतराम रहांगडाले यांचा वृद्धपकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. प्रचंड कर्तृत्ववान आणि अतिशय लोकप्रिय व त्या काळातील उच्चशिक्षित अशी महाराजजी यांची ओळख होती…

अनंतराम_फकीर_रहांगडाले यांच्या जन्म गोंदिया जिल्ह्यातील कमरगाव येथे १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. अनंतराम रहांगडाले यांचे वडील फकीर रहांगडाले हे त्या काळचे जमीनदार होते फकीर रहांगडाले अर्थात दमडी पटेल यांना पाच मुले होती. १) चैतराम २) सहेसराम ३) अनंतराम ४) नेतराम ५) हेतराम.. त्यापैकी अनंतराम रहांगडाले तिसऱ्या क्रमांकाचे…गावाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत त्यांची जमीन व्यापली होती. शेतीच्या भरवशावर सर्व काही चालायचं..शेती जास्त असल्यामुळे घरी काम करण्यासाठी मजुर असायचे….. कीर्तनकार अनंतराम रहांगडाले यांचं प्राथमिक शिक्षण हे गावीच पूर्ण झालं आणि त्यानंतर ते गोरेगाव येथील जाम्या-तिम्या विद्यालय येथे मॅट्रिक पर्यंत शिक्षण पूर्ण झालं… शिक्षणामध्ये अतिशय हुशार लहानपणापासूनच गायन आणि कीर्तनात त्यांची आवड होती. गावातील लोकांसोबत विनोद करायला त्यांना आवडत होतं. मॅट्रिक्स चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरी करण्याची इच्छा होती. अनंतराम रहांगडाले हे लहान भाऊ नेतराम रहांगडाले यांच्या सोबत एका ठिकाणी नोकरी करिता गेलेही पण त्या काळी त्यांच्या वडिलांना नोकरी करणे म्हणजे कमी दर्जाचे वाटत होते. त्यामुळे अनंतराम आणि नेतराम या दोन्ही भावांनी नोकरी करण्याचे विचार मनात ही येऊ दिले नाही. त्यानंतर महाराज जी यांनी आपल्या जीवनामध्ये कार्यक्रम करायला सुरुवात केली. सुरुवातीला भजन मंडळे त्यानंतर दंडार, बालाघाटी नकल अशा विविध कार्यक्रमांमधून त्यांनी पूर्व विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये अनेक स्टेज गाजवले. त्यानंतर समाजजागृतीचे वसा घेऊन २०१० पासून कीर्तन करायला सुरुवात केली अनेक गावांमध्ये विनोदी कीर्तनाच्या माध्यमातून व युवा पिढीमध्ये व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन व अन्य समाजहित विषयांना घेऊन त्यांनी कीर्तन केले. त्यांच्या कार्याची दखल नेतेमंडळींनी घेतली आणि त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार केले गेले. साधारणतः २०१० पर्यंत त्यांचे हे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू राहिले. पण मानवी शरीराला एका विशीष्ट वयात विश्रांती घेणे हेच उत्तम असते. मागील २ महिन्यात त्यांची प्रकृती खालावली होती. अश्यातच आज ३० मार्च २०२४ ला रात्री ०१ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली… दमडी पटील यांच्या चारही मुलांचे निधन झालेले आहे. महाराज जी यांच्या जाण्याने आमच्या आणखी एका पिढीचा अंत झाला आहे. मात्र महाराज जी यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मिळविलेली ओळख, त्यांनी समाजाशी जोडलेलं नातं, आजही आणि पुढेही तितकच घट्ट राहील.. मात्र महाराज जी यांच्या जाण्याने आमच्यासाठी एका सुवर्णकाळाचा अंत झाला हे मात्र निश्चित…

भावपुर्ण श्रद्धांजली महाराज जी (अजी) *

#Miss_U_Legend..

#My_superhero..

#Grandfather.