# विषयतज्ञ डॉक्टराकडून विविध रोंगाची तपासणी व औषधपचार
सालेकसा / बाजीराव तरोने
मेडिकल एशोशिएसन आफ इलेक्ट्रोहोमियोपेथी तालुका सालेकसा व सत्य हेच जीवन सत्संग भवन सालेकसा च्या संयुक्त विद्यमानाने सुप्रिम सुपरस्पेशालिटी हास्पिटल गोंदिया व्दारे 29 मार्च शुक्रवारला सालेकसा येथील बस स्टाप परिसरात निशुल्क भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.निशुल्क रोग निदान शिबिरात सुप्रिम सुपरस्पेशालिटी हास्पिटल गोंदियाचे संचालक डाँ. पुष्पराज गिरी, डाँ. वज्रा पी. गिरी, डाँ. चंद्रशेखर राणा, डाँ. किसन टकरांनी, डाँ. विवेक हरिनखेडे, डाँ. रंजित खरोले, डाँ. अनिल परियाल, डाँ. श्रीकांत राणा, डाँ. नेहा अग्रवाल, डाँ. आनंद कटरे, डाँ. रितेश कटरे, डाँ. कुणाल बोपचे, डाँ. दीपक हरिनखेडे, डाँ. कार्तिक हिंदुजा, डाँ. आस्था ठाकूर असे विविध रो्गांचे नामांकित विषयतज्ञ डाक्टर उपस्थित झाले असुन नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थीरोग, नाक, कान, घसा, तसेच अन्य रोगाचे विषयतज्ञ व शल्यचिकित्सक डाक्टरांच्या वतीने उपचार करण्यात आले.रक्तदाब व मधुमेह रोगाची तपासणी करुन औषध वितरण कऱण्यात आले. ईसीजी तपासणी, गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी मोफत माहिती दिली गेली. तालुक्यातील 460 ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.