गोंदिया / धनराज भगत
समूह साधन केंद्र काळीमातीची 8 वी शिक्षण परिषद व केंद्रांतर्गत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
आमगाव(ता.30 मार्च 2024) तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा काळीमाती येथे समूह साधन केंद्र काळीमातीची आठवी शिक्षण परिषद केंद्रांतर्गत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.
या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष जी. टी. रहांगडाले केंद्रप्रमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून .एम.एम.हरिणखेडे मुख्याध्यापक .डी.एस. पटले,डी.टी.लाळे,आर.एस.मेंढे, यांच्यासह केंद्रातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रास्ताविक केंद्रप्रमुख जी.टी.रहांगडाले यांनी केले. शिक्षण परिषदेचे मार्गदर्शक मनोज राठोड यांनी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व PAT परीक्षा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन श्री.चंद्रकांत शिवरकर यांनी केले. निपुण भारत अभियान अंतर्गत घेण्यात येत असलेले विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती केंद्रप्रमुख जी.टी.रहांगडाले यांनी दिली. शाळा पूर्व तयारी व भरतीस पात्र मुलांचे वयोगट याविषयी माहिती व मार्गदर्शन आनंद सरवदे यांनी दिली.
शिक्षण परिषदेनंतर केंद्र काळीमाती अंतर्गत सेवानिवृत्त झालेले.डी.आर.कटरे , एच. एन.रोकडे,एच.जी.रोकडे यांचा सपत्नीक सत्कार व सरस्वती शहारे,माधुरी बघेले व त्यांचे यजमान यांचा सत्कार समूह साधन केंद्र सत्कार समिती व केंद्रातील सर्व शिक्षक यांनी शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच याच महिन्यात बदली झालेले शिक्षक प्रीतम लाडे व भारती कठाणे यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण परिषदेचे व सेवानिवृत्त शिक्षकांचे सपत्नीक सत्कार कार्यक्रमाचे संचालन आनंद सरवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत शिवरकर यांनी मानले.
शिक्षण परिषद व सत्कार समारोह कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप होटे, एन.जी.कांबळे,जी.एस.नैताम,एस.एफ.कुरंजेकर, श्रीमती गीता भाकरे,श्रीमती पी.के.बावनकर,श्रीमती प्रियंका गायधने, श्रीमती ममता कापसे यासह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.