इमलाबाई बिसेन यांचा सेवानिवृत्त सत्कार

0
33
1

आमगाव : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव येथील आरोग्य सहायिका इमलाबाई बिसेन (भगत ) यांच्या विभागातर्फे सेवानिवृत्त सत्कार समारंभ कार्यक्रम अंतर्गत श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आरोग्य अधिकारी डाॅ. ताम्रध्वज नागपुरे, डॉ.रमा साठवने, डॉ. शितल नागरीकर, डॉ निखिल उईके, मुनेश्वर,धीरज गजभीये ,औषध विभाग प्रमुख गणेश दलाल, प्रतिमा मेश्राम, लता टेंभुरणींकर , अक्षता राऊत,ज्योती सोनवाने, जयेंद्र राऊत,लखन चौधरी, ईश्वर भोयर, थेर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता गणेश दलाल यांनी “मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा” गीत गायनने केली.

संचालन मुनेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन गजभिये यांनी केले.