मतदानाच्या दिवशी सर्व आस्थापनांना भरपगारी सुट्टी

0
26
1

गोंदिया / धनराज भगत

भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत कामगारअधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी 22 मार्च 2024 च्या शासन परिपत्रकानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

        लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावायासाठी शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीहीत्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूहमहामंडळेकंपन्या व संस्थाऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे.

            अपवादात्मक परिस्थितीत कामगारअधिकारीकर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तरमतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेलयाची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळेउद्योग समूहकंपन्या व संस्थांमध्येऔद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईलयाची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे.

            मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यासत्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार आहेअशा सूचनाही या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.