# आमगाव नगरपरिषद येथील आठ गावातील नागरिक बहिष्कार करणार निवडणूकीवर……
# अनेक राजकीय पक्ष बहिष्कारच्या विरोधात….
# सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा प्रशासनाचे आवाहन…..
# हेतू पुरस्कर मतदानापासून वंचित केल्यावर पोलीस कारवाई होणार…
गोंदिया / धनराज भगत
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद गेल्या दहा वर्षापासून नगरपरिषदेचा प्रश्न प्रलंबित आहे याबाबत राज्य शासनातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सादर करण्यात आली आहे परंतु या याचिकेवर गेल्या अनेक वर्षापासून निर्णय लागत नसल्याने आमगाव येथे नागरिकांनी आमगाव नगर संघर्ष समिती स्थापन करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बहिष्कारच्या निर्णयावर आज दि. २ एप्रिल रोजी आमगाव येथील तहसील कार्यालयामध्ये सभा घेण्यात आली होती.
आमगाव नगर परिषदेच्या प्रश्न प्रलंबित असल्याने अनेक नागरिकांची कामे होत नसल्याने आणि अनेक योजना पासून नागरिक वंचित राहत असल्याने येथील 8 गावातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णय घेतलेला आहे त्याच अनुसंगाने आज तहसील कार्यालय येथे सभा घेण्यात आली असून नागरिकांनी बहिष्कार करू नये सर्वसामान्यांचा हक्क आहे. मतदान बजावण्याचा याबाबत आपण हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याचे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आलेला आहे.
लोकशाही मार्गाने आपली भूमिका स्पष्ट: नगर परिषद संघर्ष समिति
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट
ठेवलेले प्रकरण निकाली काढावे व नागरिकांना योजनाचा लाभ मिळावा यासाठी आठ गावातील नागरिकाच्या पुढाकाराने नगर परिषद संघर्ष समिति कार्य करीत आहे. संघर्ष समितिने जनतेला न्याय मिळावा यासाठी अनेक निवेदने राज्य सरकार ला दिले. व अनेक आंदोलने, उपोषणे केले. तर आपली भूमिका ठाम ठेवत लोकशाही मार्गाने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले आहे.निवडणुकीत बहिष्कार याबाबद केंद्रीय निवडणूक आयोग,राज्य निवडणूक आयोग व राज्य शासना कडे पूर्वीच पत्रव्यवहार करून न्याय मागणी केली आहे. नुकतेच मा.मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांना सदर प्रकरण निकाली काढण्यासाठी विशेष विनंती पत्र पाठवले आहे. यात राज्य सरकार,निवडणूक आयोग यांना लेखी पत्र पाठवले आहे.तर मेल वरील मजकूर प्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयाने सदर बाबद कार्यवाही करिता नगर विकास विभाग २ कडे पत्र वर्ग केले असल्याचे संदेश समितीला दिले आहे.अशी माहिती संघर्ष समितीचे यशवंत मानकर यांनी माहिती दिली.