आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती भव्य बाईक रैली

सालेकसा/ बाजीराव तरोने

लोकसभा निवडणुकीत मतदानाची ची टक्केवारीत वाढ व्हावी मतदार यादीत ज्याची नावे आहेत प्रत्येकाने मतदान करावे ह्या हेतुने सालेकसा तालुक्याचे तहसीलदार नरसय्या कोंडागुरले यांच्या मार्गदर्शनात व कॅम्पस एबिसेडर प्रा.गणेश भदाडे प्रा.राकेश रोकडे याच्या संकल्पनेतून मतदान जनजागृती भव्य बाईक रैली आयोजन करण्यात आली जिथे जवळपास सर्वच विभाग चे अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला व बाईक रैलीतुन मतदान विषयावर अनेक संदेश देण्यात आले. या बाईक रैली च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.या रॅली आयोजनाला यशस्वी करण्यासाठी कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, युवकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करुन यशस्वी रित्या कार्यक्रम पार पाडला.

error: Content is protected !!