गोंदिया/ धनराज भगत
उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात आलेल्या स्कूल कनेक्ट अभियानाची सुरुवात म्हणून आज श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव यांनी के.के. इंग्लिश (प्रा) स्कूल आमगाव येथे एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शैक्षणिक बदलाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक बदलाची व त्याच्या सकारात्मक परिणामाबद्दल माहिती, विविध अभ्यासक्रम, रोजगार, स्वयंरोजगार आणि विविध शिष्यवृत्ती संधीची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी संसाधन व्यक्ती डॉ. तुलसीदास निंबेकर, मिस. रीना भुते, श्री महेंद्र तिवारी व प्रा. देवेंद्र बोरकर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पात्रता निकशासह विविध स्कॉलरशिप, फीस प्रतिपूर्ती आणि विविध छात्रवृत्ति योजनांची तपशीलवार माहितीपूर्ण ब्राउजर विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.
महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. डी. के. संघी व संस्थापक श्री केशवराव मानकर यांनी उपस्थितांचे व आयोजकांचे अभिनंदन व्यक्त केले.