महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ खा. प्रफुल पटेल भंडारा – गोंदियात

0
9
1

गोंदिया /धनराज भगत

भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्रातील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुनील मेंढे यांच्या चुनाव प्रचारार्थ खा. श्री प्रफुल पटेल भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दि ०४ एप्रिल २०२४ गुरुवारला दुपारी ०२.०० वा लक्ष्मीरमा सभागृह पवनी, दुपारी ०४.०० वा आशीर्वाद मंगल कार्यालय लाखांदूर, सायं ५.३० वा प्रसन्ना सभागृह परिसर अर्जुनी मोर येथे कार्यकर्ता मेळावा व सायं ७.३० वा गोरेगाव बस स्टॉप च्या मागील पटांगण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दि ०५ एप्रिल २०२४ शुक्रवारला दुपारी ०२.०० वा परमात्मा एक सेवक सभागृह, आंधळगाव रॊड मोहाडी, दुपारी ३.३० वा संताजी मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळावा तसेच सायं ६.०० वा बाजार चौक पटांगण, मुंडीकोटा ता.तिरोडा, सायं ७.३० वा बाजार चौक पटांगण, दांडेगाव ता. गोंदिया येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी वरील कार्यक्रमात महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.