1
#आमगाव तहसील मधील ३३ गावातील पाणी प्रश्न पेटला…
#…….. या गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो
# पाणी द्या पाणी…पाणी द्या पाणी…
# भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती…
# थकीत बिलापोटी विद्युत पुरवठा केले खंडित…
# मार्ग काढायला राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवली…
गोंदिया / धनराज भगत
आमगाव तालुक्यातील ३३ गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारी बनगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकीत बीलापोटी बंद पडल्याने मागील सात दिवसांपासून भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करीत आहेत.
सदर योजने अंतर्गत ३३ गावे पाण्यासाठी वणवण भटकत असताना मात्र राजकीय पुढारी प्रचारात मस्त दिसत आहेत तर दुसरीकडे जनतेचे पाणी मिळावे यासाठी त्रस्त झालेल्या आहेत.
बनगांव पाणी पुरवठा योजना सुरवातीपासूनच प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वारंवार बंद पडत आहे.
सदर पाणी पुरवठा योजना ही वाढत्या लोकसंख्या प्रमाणात विविध नावीन्यपूर्ण बदल करणे आवश्यक असताना यात कोणतेच बदल करण्यात आले नाही. पाणी पुरवठा करणारी यंत्रणा व कर वसुली करिता असलेले ग्रामपंचायती व नगर परिषद प्रशासन यात कधीच कर्तबगारी दिसून आले नाही. पाणी कर वसुलीची रक्कम व फरवरी महिना संपताच मार्च इंडींगचा भाऊगर्दीने प्रत्येक वर्षी बिले थकीत ठेवण्यात येत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे विद्युत बिले ही ४० लक्ष रूपये थकीत झाले आहे.आता विद्युत विभागाने सरळ विद्युत पुरवठा बंद केले आहे.त्यामुळे सात दिवसापासून पाणी पुरवठा बंद पडले आहे.
पाणी पुरवठा यंत्रणा विभागाने ग्रामपंचायत कडे एक कोटीच्या घरात असलेले पाणी पुरवठा कर मागणी केली तर नगर परिषद कडे १४ लक्ष रूपये थकीत निधीची मागणी केली. परंतु नगर परिषदेने थकीत मागणी कर मधील ७ लक्ष ५० हजार रुपयेचे धनादेश यंत्रणेला दिले आहे.यात धनादेश तांत्रिक कारणाने वटवले नाही. ग्राम पंचायतकडे असलेला थकीत रक्कम ही मोठ्या प्रमाणात थकीत झाले आहे.त्यामुळे या योजनेवर संकट निर्माण झाले.
पाणी पुरवठा करणारी यंत्रणा व ग्रामपंचायत नगर परिषद आमगाव येथील नियोजपूर्वक कार्य नसल्यामुळेच आज सात दिवसापासून पाणी पुरवठा बंद पडले आहे.
नागरिकांना वाढत्या उष्णतेची लाट ओलांडून पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.अनेक गावात विंदन विहीर, पाणी साठे विहीर ओस पडल्याने पाणी संकट निर्माण झाले आहे.नागरीक पाण्यासाठी रात्री चार वाजेपासून नाले,तलाव व नदी पात्रावरून पाणीसाठी पायपीट करीत आहे. आमगाव नगर परिषद परिसरातील बनगाव, किडंगिपार, बिरसी, कुंभारटोली, माल्ही या गावातील नागरिक नाल्यातील घाण असलेले पाणी पिण्यासाठी गोळा करीत आहे.परंतु प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही.तर निवडणुकीच्या आखाड्यात पुढारी वेस्त दिसत असून मात्र नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत.
प्रशासनाची दरवर्षीची दिरंगाई:
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या थकीत बिलासाठी ग्रामपंचायत ,नगर परिषद वसुलीला पुढे जात नाही.तर मार्च इंडींग पुढे करून जमा असलेली रक्कम ही यंत्रणेकडे भरण्यात येत नाही अशी अवस्था विभागाची आहे, नियोजन अभावी दरवर्षी प्रशासनाची दिरंगाई मुळे पाणी प्रश्न पेटून उठतो. योजनेत नावीन्यपूर्ण बदल करण्यात आले नाही याचा फटका नगर परिषद परिक्षेत्रातील नागरिकांना पडतो, पाणी कर भरूनही योजनेतील उर्वरित गावांमुळे स्थानिक जनतेला पाणी मिळत नाही . यात प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाणी प्रश्न सोडवावे. जनतेच्या पाणी समस्येवर नगर परिषद संघर्ष समिति सोमवरला घागर मार्च काढेल याची दखल प्रशासनाने घ्यावी. अशी माहीत संघर्ष समितीचे यशवंत मानकर उत्तम नंदेश्वर रवी क्षीरसागर यांनी दिली आहे.