विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या- प्रफुल पटेल

0
87

गोंदिया / धनराज भगत

आज लक्ष्मीरमा सभागृह पवनी येथे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्री सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी, शेतकऱ्यांना उन्नतीसाठी व या क्षेत्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने गोसेखुर्दला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देणे, शेतीची सिंचना क्षमता वाढवावी, बेरोजगार शेतमजूर यांना रोजगार मिळावा, शेतकऱ्यांना बोनस देणे यासारख्या अनेक विकास कामांना प्राधान्य देऊन व भविष्यात या क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा जेणे करुन आम्ही दोन्हीं मिळून विकास कामांना गती देण्याचे काम करू असे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले

सर्वश्री प्रफुल पटेल, सुनील मेंढे, चित्राताई वाघ, लक्ष्मी ताई सावरकर, नरेंद्र भोंडेकर, नानाभाऊ पंचबुद्धे, सुनील फुंडे, धनंजय दलाल, विजय सावरबांधे, विलास काटेखाये, ब्रम्हानंद करंजेकर, अनिल गायधने, विजय काटेखाये, मोहन सुरकर, शुभांगीताई मेंढे, जयशिलाताई भुरे, पुष्पाताई भुरे, शालिनीताई डोंगरे, शोभनाताई गौरशेट्टीवर, शैलेश मयूर, लोमेश वैद्य, चेतकभाऊ डोंगरे, छोटूभाऊ बाळबूधे, शेखरभाऊ पडोळे, हरिषभाऊ तलमले, मुकेशभाऊ बावनकर, जितुभाऊ नखाते, ललितभाऊ खोब्रागडे, सुरेशभाऊ सावरबांधे, हेमंतभाऊ मेनवाडे, चरणभाऊ पलवार, सोनुभाऊ रंगारी, गोलूभाऊ अलोणे, सोमेश्वर इखार,सहीत मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Previous articleजिल्ह्यातील ४२० मतदार करणार गृह मतदान
Next articleकोषागारातून निवृत्तीवेतनाचे प्रदान ई-कुबेर प्रणालीद्वारे