कोषागारातून निवृत्तीवेतनाचे प्रदान ई-कुबेर प्रणालीद्वारे

0
12
1

गोंदिया / धनराज भगत

जिल्हा कोषागार कार्यालयातून सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटूंबनिवृत्ती वेतनधारक यांचे मासिक पेंशन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून थेट पेंशन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे.
            पेंशन जमा करण्यासाठी जी बॅंक घेतली असेल त्याच बँक खात्यातील आय.एफ.सी.(IFSC) कोडनुसार ही पेंशन जमा होईल. जर काही पेंशनधारक यांनी कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्हयात तसेच इतर बँकेत बदल करुन घेतले असेल तर अशा पेंशनधारकांचे मासिक पेंशन जमा होण्यास अडचणी निर्माण होईल. तरी ज्या पेशंनधारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करुन घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्याठिकाणी असेल तेच खाते सुरु ठेवावे, भविष्यात पेंशनबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेंशनधारकाची राहील. जिल्हयातील सर्व निवृत्तीवेनधारक, कुटूंबनिवृत्ती वेतनधारक यांनी याबाबत काळजी  घ्यावी असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तसेच अप्पर कोषागार अधिकारी, निवृत्तीवेतन यांनी केले आहे.