गोंदिया : महायुतीच्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

0
5
1

गोंदिया / धनराज भगत

आज दि.५ एप्रिल २०२४ ला ग्रँड सीता हॉटेलच्या हॉलमध्ये गोंदिया शहरातील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, चाबी संघटन व आर.पी.आय महायुतीचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक खा. प्रफुल पटेल व  विश्वास पाठक यांच्या प्रमूख उपस्थितीत आयोजित करण्यात आली. भंडारा – गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे अधिकृत उमेदवार  सुनील मेंढे यांच्या चुनाव प्रचारार्थ आयोजित नियोजनात्मक बैठकीला खासदार  प्रफुल पटेल व मान्यवरांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करतांना महायुतीचे उमेदवार  सुनील मेंढे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी  प्रफुल पटेल  विश्वास पाठक,  राजेंद्र जैन, परिणय फुके,  विनोद अग्रवाल,  गोपालदास अग्रवाल,  रमेश कुथे,  विनोद हरिणखेडे,  पंकज रहांगडाले,  अशोक इंगळे, नानू मुदलीयार,  धनलाल ठाकरे,  राजकुमार भेलावे,  छोटूभाऊ पटले,  कशीश जायस्वाल, पूजाताई अखिलेश सेठ सहित शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.