मिडीया सेंटर’मध्ये मतदान जागृती शपथ

0
78

गोंदिया / धनराज भगत

मतदान हे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जिल्हाभरात आज मतदान जागृती शपथ घेण्यात आली. त्यानुसार निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मिडीया सेंटर’मध्ये जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली.

        भारताच्या नागरीकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवावी. आपल्या लोकशाही परंपरांचे जतन करावे. मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात मतदान करावे. निवडणुकांचे पावित्र्य राखावे, प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

         निवडणूक प्रक्रियेत मतदार हा राजा असतो. मतदान करणे हा देशातील प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याची प्रत्यक्षरित्या अंमलबजावणी करणे हे आपले कर्तव्य आहे. या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदान करुन इतरांना सुध्दा मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले.

         कार्यक्रमास जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक कैलाश गजभिये, मिडिया सेंटरमधील जिल्हा परिषदेचे माहिती शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये, तहसिल कार्यालय गोंदियाचे तलाठी डी. आय. कुर्वे, बाघ इटियाडोह कार्यालयाचे लिपीक प्रमोद कुसराम, बी. एन. आदर्श सिंधी विद्यालयाचे शिपाई जितेंद्र रेवतकर, बी. एच. जे. ज्युनियर कॉलेजचे शिपाई रमेश गोटेकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे शिपाई संतोष राऊत उपस्थित होते.