सिझर ने मालवाहू वाहन नेले जबरदस्ती ने हिसकावून,वाहन मालकाची देवळी पोलीस स्टेशनला तक्रार…

0
8
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-06 एप्रिल 2024

देवळी : स्थानिक रहिवासी अभय झोरे यांनी १ लाख २५ हजार रुपये श्रीराम फायनान्स मधून कर्ज घेतले. ६ हजार ५०० रुपये मासाीक किस्त होती. दरमहिना नियमित कर्ज भरणे सुरू होते. परंतू अक्षय झोरे यांचे वडीलांचे दु:खद निधन झाल्यामुळे १महिने गाडीचे कर्ज स्थगित राहले. दि. ४/४/२०२४ रोजी श्रीराम फायनान्स एजंट शानु शेख याने अक्षयला गाडी किरायानी पाहीजे असे सांगून टाटा २०७ एम.एच. १२ एफ.डी ७१४९ क्रमांकाची गाडी घेवून गेले. अक्षय झोरे यांना मारहाण करुन गाडीचे खाली उतरवून दिले आणि गाडी घेवून गेले. आणि गाडी परत पाहीजे असेल तर ४५ हजार रुपयाची मागणी शानु शेख या एजंटनी याबाबत रितसर पोलीसात तक्रार देण्यात आली. शानु शेख रा. हिंगणघाट व श्रीराम फायनान्सचा मॅनेजर याच्या विरोधात बळजबरीने गाडी हिसकावून पैशाची मागनी करणे असे २ गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारकर्ते अक्षय झोरे यांनी केली आहे.
पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.