मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन…

0
50

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-06 एप्रिल 2024

स्थानिक देवळी येथील सृजन इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्यू. कॉलेज देवळी येथे मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी बद्दल मतदान जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात चित्रकला, रांगोळी, पोस्टर बनविणे, वक्तृत्व स्पर्धा आणि शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यामागील उद्देश येणाऱ्या लोकसभा निवडणूक मध्ये जास्तीत जास्त जनतेनी आपला मतदानाचा अधिकार वापरला जावा असा होता.

विविध स्पर्धेत बहुसंख्येने विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राचार्या सीमा लोखंडे, मुख्याध्यापिका प्रिया वैद्य तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले.