गडचिरोली – चिमुर ( अ ज ) लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक (सामान्य) अमिनेश कुमार पाराशर यांनी आज 66 – आमगांव-देवरी विधानसभा मतदार संघातील मतदान पथकाचे प्रशिक्षण स्थळ, पोस्टल मतपत्र केंद्र, स्टॉंग रुम, कमिशनिंग प्लॅन, तैनाती योजना इ. ठिकाणी भेट देवुन कामाची पहाणी करुन उपस्थित अधिका-यांना महत्वाच्या सुचना दिल्या.
सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता गायकवाड, तहसिलदार डॉ. रविंद्र होळी आमगांव तहसिलदार संतोष महाल्ले देवरी तहसिलदार नरसय्या कोंडागुर्ले तहसिलदार सालेकसा व इतर अधिकारी उपस्थित होते.