रानडुकराच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी… ब्राह्मणटोला येथील घटना..

0
80

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले..
तुमसर तालुक्यातील ब्राह्मणटोला येथे दिनांक 6 एप्रिल रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शेतात दबा धरून बसलेल्या रानडुकराने तरुणावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. आदित्य घनश्याम बनकर वय 15 वर्षे, रा. ब्राह्मणटोला असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून हा तरुण आपल्या शेतावर गेला असता शेतात दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्याच्यावर हल्ला चढविला या हल्ल्यात त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी जखमीला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र सिहोरा हलविण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनरक्षक डी.ए. काहूडकर व पोलीस शिपाई ललित सोलंकी यांनी रुग्णालय गाठून घटनेचा पंचनामा केला. यावेळी वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व जखमीला आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Previous articleनिवडणूक निरिक्षक यांनी स्ट्रॉंग रूम व मतदान प्रशिक्षण केंद्राला भेट
Next articleजागतिक आरोग्य दिनानिमीत्त ‘माझे आरोग्य-माझा हक्क’ घोषणेने दुमदुमले शहर