# लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
गोंदिया / धनराज भगत
निवडणूक निर्णय अधिकारी, 12 गडचिरोली-चिमुर (अनुसूचित जमाती) लोकसभा मतदारसंघ यांनी 20 मार्च 2024 रोजी निवडणुकीची सूचना प्रसिध्द केलेली असून त्या अनुषंगाने निवडणूक लढविली गेल्यास शुक्रवार दि.19 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल असे सूचनेत नमूद केलेले आहे.
दिनांक 16 मार्च 2024 पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आचारसंहिता लागू झालेली आहे. त्या अनुषंगाने 12 गडचिरोली-चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 66-आमगाव विधानसभा मतदार संघाकरीता तहसिल कार्यालय देवरी येथे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरीता तक्रार निवारण केंद्र स्थापीत करण्यात आले असून सदर तक्रार निवारण केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 07199-295296 असा आहे. 66-आमगाव विधानसभा क्षेत्रातील मतदारांना निवडणूक विषयी व आचारसंहिते बाबत काही तक्रारी असल्यास नमूद करण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केल्यास तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड यांनी कळविले आहे.

