वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :- 09 एप्रिल 2024
देवळी शहरात गांधी चौक येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल शाखा देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी नववर्षाची सुरुवात ” पाडवा पहाट ” या सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. सकाळी पाच वाजता पासून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्व देवळीवाशीना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.झी युवा संगीत सम्राट फेम, ई टीव्ही गौरव महाराष्ट्राचा फेम ” स्वर दर्पण ” भूषण जाधव व पल्लवी यांचा संपूर्ण संच, नागपूर यांनी प्रस्तुत केला. नववर्षाचे स्वागत भक्तिमय संगीताने करण्यात आले. यावेळी देवळीच्या नागरिकांनी सुद्धा उत्कृष्ट अशी प्रतिसाद या कार्यक्रमाला दिली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्हा खा. रामदासजी तडस, माजी नगराध्यक्ष सौ. शोभाताई रामदास तडस, भाजपा निवडणूक प्रभारी राजूभाऊ बकाने, देवळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहाते सर, डॉ. प्रा. नरेंद्र मदनकर, सौ. वनिता मदनकर, देवळीचे ज्येष्ठ उद्योजक मोहन बाबू अग्रवाल, विनोद घीय्या, अमित सुराणा, सुशील उमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाकरिता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे कार्यकर्ते मोहन जोशी, दिनेश क्षीरसागर, संजय कामडी, गोल्डी बग्गा, गजानन महल्ले, प्रवीण तेलरांधे, प्रकाश चांभारे , अमोल गोडबोले,अनिल क्षीरसागर, गजानन मेंडुले, रवि पोटदुखे,लक्ष्मण इंगोले, गजानन पोटदुखे, सागर गोमासे,अनिकेत मरघाडे, शुभम कामडी, प्रफुल येळणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीरामाची आरती, आणि पसायदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

