मोठी बातमी…जनविकास फाऊंडेशनचा डॉ.प्रशांत पडोळेंना पाठिंबा- माजी आमदार चरण वाघमारे यांची पत्रकार परिषदेतून माहिती

0
8
1

जिल्हा प्रतिनिधी/सतीश पटले 

भंडारा – भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज छाननी नंतर समर्थनाची भूमिका जाहीर करु त्यानुसार विकास फाऊंडेशनचा मेळावा घेऊन गुप्त मतदान पद्धतीने कार्यकर्त्यांची मते जाणुन कार्यकर्त्यांचा मतांचा आदर ठेऊन काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची माहिती विकास फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांबाबत स्वपक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात आली असताना आमचा उमेदवार नसल्याने समर्थन कोणाला करावा, स्वमर्जीने समर्थन दिल्यास संघटनेत नाराजीचा सुर उमटू नये याकरिता ४ एप्रील रोजी सक्रीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला व गुप्त मतदान पद्धतीने कार्यकर्त्यांची मते जाणुन घेतली. मतमोजणी नंतर असे चित्र स्पष्ट झाले की, चरणभाऊंनी निर्णय घ्यावा तो आम्हा सर्वांना मान्य राहील. मात्र ज्या पक्षाने वेळोवेळी आपल्यावर अन्याय केला त्या भाजपच्या उमेदवाराला हरवण्यासाठी स्पर्धेत असणाऱ्या काँग्रेसच्या डॉ प्रशांत पडोळे यांना समर्थन दिल्यास योग्य होईल अशी भावना सुध्दा मतपेटीतून व्यक्त करण्यात आली.या निवडणुकीत १८ उमेदवार रिंगणात असुन भाजपचे सुनील मेंढे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. मागील निवडणुकीत मी भक्कमपणे मेंढे सोबत खंबीरपणे उभा होतो. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मेंढेंनी भाजपच्या अनेक मोठ्या नेत्याजवळ माझा विरोध करुन माझी तिकीट कापुन मी अपक्ष असतांनी मेंढेसह भाजपच्या अनेक नेत्यांनी मला हरवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. अनेक नेत्यांनी भाजपचा उमेदवार जिंकु शकत नाही हे स्पष्ट झाले तेव्हा काही भागात भाजपची मते राष्ट्रवादीकडे वळवल्या गेली. शेवटी व्हायचे ते झाले माझे निलंबन झाले. पण कालांतराने जि प पंस निवडणुका लक्षात घेऊन माझे निलंबन रद्द करण्यात करुन निवडणुक प्रमुख बनविले. जी प अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केल्याने पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला निलंबीत करण्याची घोषणा करीत असताना खासदार म्हणुन माझी बाजु घेतली नाही. म्हणुन मेंढेंना समर्थन दिल्यास मला व माझ्या कार्यकर्त्यांना भविष्यात कोणताच राजकीदृष्ट्या फायदा नाही उलट त्रासच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सामाजिक बांधिलकी लक्षात घेता बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर भाजपमध्ये असतांनी २०१९ च्या माझ्या निवडणुकीत माझ्या विरोधात भाजपच्या प्रदीप पडोळेसाठी संपुर्ण ताकद पणाला लावली. यावरही नगर पंचायत मोहाडी निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत असतांना या कुंभलकरांनी ४ नगरसेवक फोडून १४ दिवस राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. यांनी सुध्दा मला घरी येऊन समर्थन मागितले तेव्हा प्रदीप पडोळे व मोहाडीचे ४ नगरसेवक यांना कामात लावल्यास समाज या नात्याने समर्थन करु अशी सुचना दिली असता हे शक्य नाही असे उत्तर मिळाल्याने यांना समर्थन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.सध्या देशात इडी सीबीआय चा गैरवापर करून सत्ताधारी भाजपकडून पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरु असुन ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तीच सेना फोडली. ज्या शरद पवारांनी राष्ट्वादी काँग्रेस पक्ष स्थापित केला ती राष्ट्रवादी सुध्दा फोडून देशात एकाधिकारशाही सुरु आहे अशा भाजपचे शिवसैनिक या नात्याने मी व कोणताही शिवसैनिक भाजपचे समर्थन करु शकत नाही. बाबासाहेबांच्या राज्यघटनेतील मतदाराचा मतदानाचा अधिकार या हक्काचा वापर करून मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदान करणे आवश्यक असल्याने काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे माझे जवळचे नसले तरी यांचे वडील स्व. यादोरावजी पडोळे शिवसेनेत असताना २००० साली मी जी प सदस्य असतांना आम्ही सेनेचे दोन सदस्य होतो. संजय निरुपम आमचे संपर्क प्रमुख होते. अशात जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादी भाजप सेना अशी युती होऊनही दोन सदस्य कमी पडत होते. तेव्हा यादोरावजी पडोळे यांनी स्वतःचे कौशल्य वापरून कांग्रेस नेते जिया पटेल यांचे वडील रहीमबाबा पटेल यांचेसह काँग्रेसचे दोन सदस्य फोडून मला व माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे यांना मतदान केल्याने आम्हाला सभापती होता आले. त्यामुळे आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड माणुसकी या नात्याने व आमचा उमेदवार नसल्याने सुनील मेंढे व भाजपने केलेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी मी माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन डॉ प्रशांत पडोळे यांना समर्थन जाहीर करीत आहे. याव्यतिरिक्त स्व.यादोरावजी पडोळे यांनी अनेक लोकांना मदत केली आहे त्यांनी सुध्दा उपकाराची जान ठेऊन प्रशांत पडोळे यांना मदत करावी. कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना चरण वाघमारे यांनी काही अटी ठेवल्या असतील असे वाटत असल्यास या समर्थनामागे माझी कोणतीही अट नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही जागा आम्ही विकास फाऊंडेशनच्या बॅनर खाली लढणार असल्याने तसेच मी या पक्षाचा प्राथमिक सदस्य नसल्याने मला काँग्रेसची तिकीटही नको आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शंका बाळगू नये. विकास फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या स्थानिक गावपातळीवरील विरोध बाजूला ठेऊन मनापासून कामाला लागावे. या समर्थनाने पुन्हा भांबावलेल्या पक्षाचे अनेक नेते किंवा पदाधिकारी उलटसुलट प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतील त्यांनासुद्धा सडेतोड उत्तर दिल्या जाईल.याप्रसंगी धनंजयजी मोहकर, डॉ प्रकाशजी मालगावे, अरविंदजी भालाधरे, भाष्करजी हटवार, ललितजी शुक्ला, बालुभाऊ सेलोकर,नंदुजी रहांगडाले, बब्लूजी मलेवार ,राजुभाऊ रेवतकर,हीरालालजी नागपुरे, राजेशजी पटले, प्रशांतजी लांजेवार,हरिश्चंद्र बंधाटे, छोटुभाऊ तुरकर, मेहताबशिंगजी ठाकुर, हिरालालजी रोटके, हंसराज आगासे, बालचंद पाटील, अरूणजी भेदे, राहुलजी फुंडे , सेवकजी चींधालोरे, राजु गायधने, चंद्रशेखर भिवगडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.