निवडणूक निरीक्षक यांच्याकडून ईव्हीएम व्हीव्हीपॅट पाहणी

0
2
1

गोंदिया / धनराज भगत

गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) राहुल कुमार तसेच जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी ६६-आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम व्हीव्हीपॅट कमिशनिंग अभिकंप सिलींग स्थळ, अभिमत मतदान (मॉक पोल), स्ट्रॉंग रुम इत्यादी ठिकाणी भेट देवून कामाची पाहणी केली. पाहणीचे वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक कामाबाबत आवश्यक त्या महत्वाच्या सूचना दिल्या. भेटीचे वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड, आमगाव तहसिलदार रविंद्र होळी, देवरी तहसिलदार संतोष महाले, सालेकसा तहसिलदार नरसय्या कोंडागुर्ले, अप्पर तहसिलदार चिचगड माधुरी टेकाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.