जिल्ह्यात 6 लाख 71 हजार  ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप

0
103

जिल्हा प्रशासनाचा घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न

         गोंदिया / धनराज भगत 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ८५ टक्क्याच्या वर वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार माहिती चिठ्ठी’चे वाटप जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 10 लाख 92 हजार 546 मतदार असून आतापर्यंत 6 लाख 71 हजार 582 मतदारांपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘मतदार माहिती चिठ्ठी’ पोहचविण्यात आलेली आहे. सर्व मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी (वोटर स्लिप) पोहोचविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
         याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. नायर यांनी नुकताच आढावा घेऊन सूचना दिल्या. श्री. नायर  म्हणाले, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बी.एल.ओ. मार्फत ‘मतदार माहिती चिठ्ठी’ लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. ज्या क्षेत्रात मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप होते, त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते. कारण आपले नाव मतदार यादीत आहे, याबाबत नागरिकांना खात्री होते. त्यामुळे ‘मतदार माहिती चिठ्ठी’चे नियमीत वाटप करा. अधिकाऱ्यांनी सुध्दा क्रॉस चेकिंग करून मतदारांपर्यंत माहिती चिठ्ठी पोहोचले किंवा नाही याची खातरजमा करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
           विधानसभा मतदारसंघ निहाय ‘मतदार माहिती चिठ्ठी’चे वाटप : जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 71 हजार 582 मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठ्या पोहचविण्यात आलेल्या असून यात 63-अर्जुनी मोरगाव मतदारसंघात 1 लाख 57 हजार 444. 64-तिरोडा मतदारसंघात 2 लाख 6 हजार 900. 65-गोंदिया मतदारसंघात 1 लाख 96 हजार 690, तर 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 10 हजार 548 मतदारांचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून आता बी.एल.ओ. मार्फत घरोघरी ‘मतदार माहिती चिठ्ठ्यांचे’ वाटप करण्यात येत आहे. उर्वरीत 4 लाख 20 हजार 964 मतदार माहिती चिठ्ठी 16 एप्रिल पर्यंत वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. 
Previous articleमतदानाच्या दोन दिवसापूर्वी व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश
Next articleकिरण मोरे चौहान याना कर्तृत्ववान महिला या पुरस्काराने सन्मानित