किरण मोरे चौहान याना कर्तृत्ववान महिला या पुरस्काराने सन्मानित

0
4
1

सालेकसा / मायकल मेश्राम

नागपूर येथील लहू सेना संस्थाकडून झाशी राणी,मेट्रो स्टेशन जवळ अंबाझरी रोड बर्डी येथील अमृत भवन सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच समाजसेविका,गुणवन्त विद्यार्थिनी यांचा कर्तृत्ववान महिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सालेकसा येथील किरणताई मोरे चव्हाण यांना सुद्धा समाजकार्यासाठी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष संध्या कठाळे,लहू सेना संस्थापक अध्यक्ष संजय कठाळे,उदघाटक कांचन गडकरी, प्रमुख पाहुणे अर्चना डेहनकर,साधना बरडे,भारती खडसे,शुभांगी ग्वालबंशी,साधना इंगळे,गीता इंगोले,मेघा कोचे,साधना मेश्राम, सुमेधा चौधरी,भाग्यश्री चौबे इतर मान्यवर उपस्थित होते. तेव्हा त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.