तिरोडा / सदानंद पटले
आज दि.१३ एप्रिल २०२४ रोजी कुंभारे लॉन, तिरोडा येथे भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ तिरोडा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणे मान्य नाही म्हणून आपले अनेक जुने सहकारी आता पुन्हा एकदा आपल्यात सामील होत आहेत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा मोठा मतदार वर्ग प्रशांत पडोळे यांना निवडून आणतील हा विश्वास आहे. नेते पक्ष सोडून गेल्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना मोठी संधी उपलब्ध झाली. त्यामुळे आपल्या पक्षात गुणात्मक बदल झालेला आहे.
जगभरातील हिंदू बांधवांनी देणगी दिली त्यातूनच भव्य राम मंदिर उभारले गेले. त्यामुळे या मंदिर उभारणीचे श्रेय त्या प्रत्येक बांधवाला जाते ज्यांनी निर्माण कार्यात मदत केली. त्यामुळे राम मंदिरावर मते मागण्याचा अधिकार कोणत्याच पक्षाचा नाही. भावनाविवश न होता आपल्या समस्या दूर करण्यासाठी योग्य उमेदवार निवडा असे प्रतिपादन केले.
यावेळी महिला प्रांतअध्यक्ष सौ. रोहिणीताई खडसे, युवक प्रांतअध्यक्ष मेहबूब भाई शेख, विद्यार्थी प्रांताध्यक्ष सुनिल गव्हाणे, माजी खासदार मधुकर कुकडे, सौरभ मिश्रा, शैलेंद्र तिवारी, जिल्हा अध्यक्ष दिलीप बन्सोड,रविकांत बोपचे, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ मंजुताई डोंगरवार, अनुसुचित जमाती सेल जिल्हाध्यक्ष शामराव जी उईके, अशोक अरोरा, शहर अध्यक्ष पवन मोरे, संचालक ओम पटले, तालुका अध्यक्ष रमेश टेंभरे, तालुका अध्यक्ष हेमराज अंबुले, तालुका अध्यक्ष प्रकाश बघेले, गिरधर जी बिसेन, रमेश पटले, अनुसुचित जमाती सेल तिरोडा तालुका अध्यक्ष भोजराज उईके, रामेश्वर हलमारे, सौ वनिताताई ठाकरे, शहर अध्यक्ष सौ रश्मीताई गौर, तिरोडा महिला अध्यक्ष सौ भाग्यश्री ताई केळवतकर, गोरेगाव महिला अध्यक्ष सौ वैशालीताई तूरकर, कार्याध्यक्ष सौ छायाताई टेकाम,सरपंच दीपलता ठकरेले आदिंसह मविआ चे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.