वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत आगामी सण आणि 17 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने देवळी पोलिसांनी शहरात लॉंग रूट मार्च काढण्यात आला.यावेळी ठाणेदार सार्थक नेहाते, पोलिस उपनिरीक्षक विशाल डोणेकर, अश्विन गजभिये, जगदिश हटवार, इतर अधिकारी तसेच 25 गृहरक्षक, अतिरिक्त केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे 90 जवान व तीन अधिकारी उपस्थित होते.
शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या रूट मार्चने तसेच पोलिस वाहनाच्या सायरनच्या आवाजाने नागरिकांचे लक्ष
वेधले. नागरिकांना शांतता आणि व्यवस्था राखण्याचे आव्हान करण्यात आले .

