देवळी : सृजन इंग्लिश मिडीयम व ज्यू. कॉलेज मध्ये वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी……….

0
8
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-15 एप्रिल 2024

स्थानिक देवळी येथील सृजन इंग्लिश मिडीयम व ज्यू. कॉलेज देवळी च्या वतीने दिनांक 14 एप्रिल 2024 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा म्हणून डॉ. श्रद्धा पंकज चोरे (संस्था अध्यक्षा ) होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रिती प्रशांत चव्हाण होत्या. तसेच प्राचार्या सिमा वाघमारे, मुख्याध्यापिका प्रिया वैद्य यांची उपस्थिती होती.   कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार व फुल अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा पंकज चोरे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्य आचरणात आणावे तसेच जास्तीतजास्त वाचन करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले. तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब यांचा सर्व समाजा बद्दल असलेले कार्य या बद्दल विध्यार्थाना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांचे भाषणे घेण्यात आली. यावेळी स्वच्छ अभियाना सोबतच मतदार जनजागृती अभियान चा कार्यक्रम घेण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रिया वैद्य यांनी केले. संचालन प्रीती वैतागे यांनी तर आभार स्नेहा लाडेकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारीवृंद व विध्यार्थी यांनी सहकार्य केले.