महाराष्ट्र प्रदेश पुरस्कृत “साहित्य भारती” कार्यकारिणी घोषित

0
38
1

गोंदिया / धनराज भगत

अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश द्वारा पुरस्कृत साहित्य भारती ची सन 2024-25 करिता कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. त्यात प्रदेश अध्यक्ष म्हणून वाशीम येथील सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री श्री नामदेव कांबळे यांची तर प्रदेश महामंत्री म्हणून नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.पृथ्वीराज तौर यांची नियुक्ती घोषित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून ठाणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा “चैत्रेय” या एकमेव असलेल्या वासंतिक वार्षिकांकाचे संपादक प्रा.डाॅ.नरेंद्र पाठक यांची तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत विदर्भ प्रांतातून गोंदिया जिल्ह्यातील ॲड.लखनसिंह कटरे, नागपूर येथील ॲड.सचिन नारळे व अकोला येथील सौ.मोहिनी मोडक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.