विद्या निकेतन महाविद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0
8
1

गोंदिया/ धनराज भगत

आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.जी.एस. लोथे,प्रा.एम.एम.हाडोळे,रासेयो समन्वयक प्रा.जी.बी.तरोणे, प्रा.एस.पी.बुराडे,प्रा.एस.एन.सातोकर, प्रा.पी.जी.कटरे,प्रा.एस.एस.बारसे, प्रा.पी.आर.दारव्हनकर, ,प्रा.पी.एम.मानापूरे, प्रा.जे.जी.लिल्हारे,प्रा.हेमलता कावळे,प्रा.पी.एम.हजारे, प्रा.जे आर.घुले, प्रा.विणा लिल्हारे,प्रा.निलिमा ठवरे, प्रा.पी.एम.कुंभलवार,प्रा.डी.एस.आसटकर,प्रा.पी.एम.बोंबार्डे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे यांनी डाॅ.बाबासाहेब बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.संचालन प्रा.पी.जी.कटरे यांनी केले व आभार मानले.कार्यक्रमास शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.