डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे तारणहार – सुरेन्द्रकुमार खोब्रागडे

0
55

गोंदिया / धनराज भगत

आमगांव तालुक्यातील कट्टीपार येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमीत्त मार्गदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आला.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे तारणहार व देशातील तमाम महिलांचे भाग्यविधाते होते.
ज्या बहुजनांना व महिलांना शिक्षणाची बंदी होती महिला चुल आणि मुल च्या पलीकडे काहीही नव्हत्या त्या बहुजन समाजाला व महिलांना हिंदु कोडबील द्वारे सामाजिक न्याय व समानता दिली. त्यामुळे बहुजनांचा सर्वांगीण विकास झाला व महिला प्रधानमंत्री, राष्ट्रपती, कलेक्टर, वकिल होऊन राजकारणात पुरूषांपेक्षा पुढे जात आहेत. हे सर्व हक्क व संवैधानीक अधिकार राज्य घटनेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरानी दिले.करिता बहुजनांनी व महिलांनी आपली जबाबदारी ओळखुन बाबासाहेबांचे कार्य पुढे नेण्याचे आव्हान फुले शाहु आंबेडकर विचारवंत व भारतीय बौद्ध महासभा तालुका आमगांव चे अध्यक्ष सुरेन्द्रकुमार खोब्रागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उदघाटक रामेश्वर शामकुवर कुंभारटोली तर प्रमुख पाहुणे माजी सरपंच सुरेन्द्र कोटांगले, माजी जि.प. सद्स्या उषा हर्षे, भारतीय बौद्ध महासभा गोंदिया च्या कोषाध्यक्ष शारदा कोटांगले, उपाध्यक्ष मनोज टेंभुर्णीकर,हितेश शहारे उपस्थित होते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कट्टीपार चे अध्यक्ष विनोद शहारे, सचिव दिपक कोंटागले,कोषाध्यक्ष निरंजन मेश्राम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव दिपक कोंटागले व आभार चंद्रभान कोंटागले यांनी केले.

Previous articleविद्या निकेतन महाविद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Next articleग्रामपंचायत काळीमाती येथे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी