आई – बाबा मतदान करा १९ एप्रिल ला…!

0
123

गोंदिया / धनराज भगत

जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया तर्फे मतदाता जागृती अभियान अंतर्गत आज दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी आदर्श विद्यालय आमगाव येथे विद्यार्थ्यांना “आई – बाबा मतदान करा १९ एप्रिल ला” या आशयाचे चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी घरी जाऊन आपल्या पालकांना ही चिठ्ठी दाखविणार आहेत व त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणार आहेत.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ sweep कार्यक्रम अंतर्गत हे अभियान सर्व शाळांना राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून आले आहेत.
या प्रसंगी प्राचार्य डी. एम. राऊत, उपमुख्याध्यापक  डी. बी. मेश्राम, पर्यवेक्षक  यू. एस. मेंढे तसेच सर्व शिक्षक, व विद्यार्थ्यांच्या समवेत हा अभियान राबविण्यात आला.