निवडणुकीच्या धामधुमीतही जयश्री पुंडकर यांनी मानवतेचे दर्शन घडवून दिले

0
77

गोंदिया / धनराज भगत

 गडचिरोली- चिमूर लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान आमगाव तालुक्यातील 21 मतदान केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधव व भगिनी करिता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष जयश्री पुंडकर व संघटनेच्या सदस्यांनी ग्राम बिरसी ,शिवनी चिरचाळबांध, बासीपार , सीतेपार ,कट्टीपार, किडंगीपार, गोरठा, जामखारी, पाऊलदौना, बोरकन्हार, पदमपूर बाम्हणी ,बनगाव कुंभारटोली, आणि आमगाव येथे रखरखत्या उन्हात पुणे, पिंपरी चिंचवड अहमदनगर, मुंबई ,गोंदिया येथून आलेल्या 80 पोलीस बांधव व भगिनींना बुथवर जाऊन मानवतेचा दृष्टीकोन मनात बाळगून थंडपेय व थंडगार पाण्याच्या बाटलीचे वाटप केले.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष जयश्री पुंडकर या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कठोर कर्तव्यदक्षते प्रति सहानुभूती बाळगून त्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्याचे कार्य मागील सात वर्षापासून संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या नेतृत्वात करीत असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Previous articleभंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीत 5 वाजेपर्यंत 56.12 टक्के मतदान
Next articleसीताबाई गणूजी चव्हाण यांचे निधन