महावितरणाचे 23 हजाराचे साहित्य चोरट्यांनी पडविले

0
90

गोंदिया / धनराज भगत

आमगाव तालुक्यातील गोंदिया आमगाव मार्गावर लकडकोट ते गोरठा रोड दरम्यान महावितरणाच्या आर डी एस एस चे विद्युत वाहिन्या जोडणीचे कार्य सुरू आहे . लोखंडी पोलवर एल्युमिनियमचे तार 24 मार्च 2024 रोजी लावण्यात आले होते. त्यापैकी पाच लोखंडी खांबावरील 20,800/- रुपये किमतीचे एल्युमिनियम तार आणि 2,720 /- रुपये किमतीचे आठ अर्थिंग लोखंडी पाईप अशा एकूण 23 हजार 600 रुपये किमतीच्या मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पोलवर चढून तार कापून चोरून घेऊन गेले.
सदर कामाचे इन्चार्ज ऋषिकेश बादलवार राहणार रामनगर गोंदिया यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी दिनांक 17 /4 /2024 रोजी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसातर्फे पुढील तपास सुरू आहे.