धक्कादायक : १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण व अमानुष अत्याचार करून केली हत्या

0
108

गोंदिया जिल्हा हादरला; देवरी तालुक्यातील गोटानपार येथील दुर्दैवी घटना, आरोपी फरार

गोंदिया / धनराज भगत

” एकीकडे लोकशाही मजबूत करण्याकरिता मतदानाचे कर्तव्य पार पाडत असतानाच दुसरीकडे अवघ्या १२ वर्षाच्या चिमुकल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून संपवण्यात आलं या संतापजनक घटनेमुळे देवरी तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला असून पुन्हा एकदा मुलीच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चिचगड पोलिसांना ही घटना कळताच त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली, सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार बातमी लिहेपर्यंत अजूनही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
देवरी तालुक्यातील ककोडी क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत गोटानपार येथे ता.१९ रोजी लग्नकार्यात आलेल्या १२ वर्षीय चिमुकल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अमाणूस अत्याचार करत हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना आज ता. २० रोजी समोर आली आहे. या घटनेमुळे देवरी तालुक्यासह देवरी अवघा गोंदिया जिल्हा हादरलाअसून आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागनी होत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजा गोटानपार येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील – मुलगा राकेश उर्फ रॉकी वकुरूसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता उर्फ लता यांचे ता. १९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता लग्न आयोजित करण्यात आलेलं होतं. याच लग्नात अवघ्या सहाव्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन बारा वर्षीय मुलगी होती त्याचवेळी अंधाराचा फायदा घेवून नराधमांनी त्या चिमूकलीच अपहरण करून गावाशेजारी असणाऱ्या जंगलात अत्याचार केला. व डोक्यावर जबर मारहाण करून हत्या केल्याची विदारक घटना समोर आली आहे. घडलेल्या घटना क्रमावरून ही घटना सामूहिकरीत्या करण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास येत आहे घटनेचा तपास चिचगड पोलीस स्टेशन करत असून अजून पर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. घडलेली घटना अतिशय माणूस व दुर्दैवी असून ताबडतोब आरोपींना अटक करून शिक्षा करावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

साभार : तांदूळ नगरी

Previous articleमहावितरणाचे 23 हजाराचे साहित्य चोरट्यांनी पडविले
Next articleरक्त दान हे जीवन दान आहे, संचालक बी.प्रभाकरन लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड..