सावधान…. गोंदियाच्या बाजारात डुप्लिकेट तुळीची डाळ….

0
5
1

जप्त केलेल्या बटरी दाळीत सिन्थेटीक फुड कलर टारटाझीन असल्याचे स्पष्ट

गोंदिया / धनराज भगत

 अन्न व औषध प्रशासन, गोंदिया कार्यालयास प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन गुप्त माहितीच्या आधारे 19 ऑक्टोबर 2023 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी शितल देशपांडे यांनी गोंदिया शहरातील मेसर्स प्रभुदास अट्टलमल, मालवीया वार्ड, बाजपेई चौक, गोंदिया येथे कार्यवाही करुन रंगीत बटरी दाळीचा नमूना घेऊन उर्वरीत साठा 418 किलो, किंमत 30 हजार 96 रुपये जप्त केला होता. सदर दाळीस सिन्थेटीक फुड कलर टारटाझीन असल्याचे तपासाअंती स्पष्ट झालेले आहे. सदर रंगीत बटरी दाळ ही तूरदाळ म्हणून बाजारात विक्री होत असल्याचे निदर्शनास आलेले होते. या प्रकरणी विक्रेता चंद्रकुमार प्रभुदास भक्तानी व मध्यप्रदेशातील पुरवठादार व उत्पादक यांचेविरुध्द न्यायालयीन कार्यवाहीची प्रक्रिया सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
         नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना त्याच्या वेष्टनावर (बॅगवर) उत्पादकाचा पूर्ण पत्ता, उत्पादन दिनांक, बॅच नंबर, सदर अन्नपदार्थाचा सर्वोत्तम कालावधी, FSSAI परवाना क्रमांक नमूद असलेले अन्नपदार्थच खरेदी करावेत. अन्नपदार्थ ज्या नावाने खरेदी केले आहे त्याचे खरेदी बील स्वत:कडे ठेवावे व विक्री करतांना त्याच नावाने विक्री करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी केले आहे.