धक्कादायक! ट्रकखाली दुचाकी आल्याने दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी… पवणारा येथील घटना…

0
62

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

तुमसर तालुक्यातील तुमसर कटंगी राज्य मार्गावरील पवणारा येथे काल दिनांक 23 एप्रिल रोज मंगळवार सायंकाळी 7 वाजता ट्रकखाली दुचाकी आल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सविस्तर वृत्त असे की, विजय धुर्वे समीर वट्टी दोघेही रा. चिखला तसेच तुफान उईके रा. टेकाडी, मध्यप्रदेश हे दुचाकी वर ट्रिपल सीट बसून नागपूरवरून गावाकडे जात असताना पवणारा गावाजवळ समोरून येत असलेल्या ट्रकखाली दुचाकी आली. यात विजय धुर्वे व तुफान उईके याचा जागीच मृत्यू झाला तर समीर वट्टी याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारार्थ सामान्य जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले आहे.

Previous articleसावधान…. गोंदियाच्या बाजारात डुप्लिकेट तुळीची डाळ….
Next articleविनय भंग करून तिच्या हत्या प्रकरणातील दोषींना अटक करण्यात बाबद सालेकसा पोलिसांना निवेदन