विनय भंग करून तिच्या हत्या प्रकरणातील दोषींना अटक करण्यात बाबद सालेकसा पोलिसांना निवेदन

0
5
1
सालेकसा/ बाजीराव तरोने

गोटानपार ता. देवरी येथील अल्पवयीन मुलीवर विनय भंग करून तिच्या हत्या प्रकरणातील दोषींना अटक करण्याबाबत पोलीस स्टेशन सालेकसा येथे निवेदन देण्यात आले.
देवरी तालुका अंतर्गत येणाऱ्या गोटानपार या गावी दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी शनिवारला अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग व तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली ही बाब खूप संताप जनक असून सदर कुटुंबांना न्याय मिळून देण्यात यावा अशा प्रकारची मानवीय कृत्येची पुनरावृती होऊ नये म्हणून. या प्रकरणातील आरोपीचा शोध लवकरात लवकर घेऊन आरोपींना कठोर शिक्षा यावी अशा प्रकारचे पोलीस निरीक्षक साहेब सालेकसा यांना निवेदन देण्यात आले .यावेळी निवेदन देताना पंचायत समिती सदस्य व बेटी बचाओ बेटी पढाओ गोंदिया जिल्हा संयोजक अर्चना मडावी, कविता येटरे बेटी बचाओ बेटी पढाओ सालेकसा तालुका सहसंयोजक दिपाली बारसे,संगीता पंधरे, कू .आराध्या पंधरे कू.लावण्या बारसे खुशी एकुलकर आदी उपस्थित होते.