# फळबागातील आंबा पीक उद्ध्वस्त… #भात उत्पादनावर परिणाम
गोंदिया / धनराज भगत
काल दि.२३ एप्रिल २०२४ रोजी रात्री आलेल्या भीषण वादळामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमगांव वरुन 13 किमी अंतरावर असलेल्या वडद गावातील आंबाच्या बागेत उगवलेली झाडे वादळामुळे उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. 15 एकर जमिनीवर लावलेली 3 हजार आंब्याची झाडे उद्ध्वस्त झाल्याने सुमारे 15 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे बागेचे मालक शेतकरी किशोर रहांगडाले यांनी सांगितले. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अशा अनेक शेतकऱ्यांच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास रब्बी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शासनानी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.