आमगाव तालुक्यातील बाघ पाटबंधारे व्यवस्थापन आमगाव शाखा अंतर्गत बनगाव (अनिहानगर)येथील कालव्यात जागोजागी वॉटर फॉल तयार केले. परंतु अपूर्ण कामे करून कंत्राटदार पसार झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. तालुक्यातील बाघ पाटबंधारे व्यवस्थापन आमगाव शाखा अंतर्गत बनगाव येथील कालव्यात दोन महिन्यापूर्वी फॉल तयार करण्यासाठी नहराचे खोदकाम करण्यात आले. नंतर फॉल तयार करून तेथील मातीचा ढिगार आणि मोठा सिमेंट पाईप कालव्यात तसेच ठेवण्यात आले, यामुळे पाण्याचा साठा साचून राहतो कालव्यातील दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्घधी पसरलेली आहे. जवळच दुतारफा वसाहत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वॉटर फॉल तयार करतांनी कालव्याची पाळ सुद्धा फोडून टाकण्यात आली आहे, म्हणून शेतकऱ्यांना आणि वाटसरुंना ये-जा करणे कठीण होत आहे. कंत्राटदार यांची बिल पूर्तीची कामे झाली असेल पण त्या ठिकाणी केलेला खोदकाम, तोडलेली पाळ,त्यानीं टाकलेला मलबा, मोंगाळ आदिची विल्हेवाट करावी अशी मागणी सेवा सहकारी संस्थेचे संचालक राजु फुंडे यांनी केली आहे.
या संबंधी कंत्राटदार अग्रवाल , शाखा अभियंता बहेकार यांना मौखिक कळविण्यात आले आहे ,पण कालव्यातील मलबा काढण्यास अद्याप यंत्रणा सरसावल्या नाही, तसेच नवीन कंत्राटकाढून फॉल जवळील जागेत सिमेंटीकरण करावं जेणेकरून पाण्याच्या गतीमुळे कालवा फुटणार नाही याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाची चेतावणी नागरिकांनी दिली आहे.