निवडणूक – २०२४ : आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला

0
47

गोंदिया / धनराज भगत

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील मतदानाचे अंतिम चित्र १९ एप्रिलनंतर स्पष्ट झाले. या मतदारसंघात ७१. ८८ टक्के मतदान झाले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ०. ४५ टक्के मतदान कमी झाले असले तरी आमगाव विधानसभा मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत मतदान वाढले आहे. त्यामुळे वाढीव मतदानाचा टक्का कुणासाठी फायद्याचा याचीच चर्चा सध्या आमगाव विधानसभा मतदारसंघात आहे. यंदा लोकसभा निवडणुकी दरम्यान प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती.