आरटीओने मिळवून दिला 60 कोटींचा महसूल

0
8
1

गोंदिया / धनराज भगत

   उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उच्चांकी 59 कोटी 29 लक्ष इतका शासकीय महसूल महाराष्ट्र शासनाला मिळवून दिला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 6 कोटींचा जास्तीचा महसूल प्राप्त झालेला आहे.
        यामध्ये प्रामुख्याने वाहनावरील कर, विविध सेवांकरिता शुल्क तसेच दंडवसुली इत्यादींचा समावेश आहे. यावर्षी कार्यालयामार्फत 17 हजार 457 दुचाकी, 1 हजार 828 चारचाकी व इतर 2 हजार 684 अशा एकूण 21 हजार 969 इतक्या वाहनांची नोंदणी करण्यात आलेली आहे. कार्यालयाच्या वायुवेग पथकाने 4 हजार 649 वाहनांवर कारवाई करुन 01 कोटी 51 लक्ष इतकी दंडवसुली केलेली आहे, तर सीमा तपासणी नाका देवरी येथून 7 कोटी 18 लक्ष इतका महसूल प्राप्त झालेला आहे.
         गोंदिया जिल्हा नक्षलप्रभावीत, आदिवासी बहुल तसेच मागासलेला असूनही उप प्रादेशिक परिवहन गोंदिया कार्यालयाने मोठया प्रमाणात शासनाला महसूल मिळवून दिलेला आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितले.